जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील सोमणगाव येथे असलेली जुनी पाण्याची टाकीची बिकट अवस्था झालेली होती. गाव स्थापनेपासुनच आजपर्यत याच पाण्याच्या टाकीमधून गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आलेला आहे.
सदर टाकी जुनी झाल्यामुळे जीर्ण अवस्थेकडे कल असतांना नागरीकांची प्रचंड मागणी वजा विनंतीवरून ग्रामपंचायतने दखल घेत चौदाव्या वित्त आयोगातुन निधी उपलब्ध करुन आज ४ रोजी उदघाटन करण्यात आले.
प्रसंगी पं.समिती सदस्य विकास पाटील, सरपंच मिनाताई कोळी, उपसरंपंच नंदु नमायते, सदस्य शारदा कोळी,अनिल कोळी व नागरीक पंडीराव पाटील, माणिकराव पाटील, नितीन पाटील, नामदेव कोळी, विनोद कोळी, सुनिल कोळी, रविंद्र कोळी, बाजिराव सोनवणे, देवांनंद चव्हाण, ज्ञानेश्वर बावस्कर, रामचंद्र कोळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते..