ईडी चौकशी : खडसेंच्या जावयाचा जामीन अर्ज फेटाळला

सप्टेंबर 3, 2021 5:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. मनाला जात आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे. या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात आली होती मात्र सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर जामीन नाकारण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

girish chaudhari

गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसीचा भूखंड खरेदी करताना रक्कम कुठून आणली यासंदर्भात ईडीचा अद्यापपर्यंत तपास सुरू आहे. 31 कोटीची मालमत्ता असताना तीन कोटी मध्ये कशी खरेदी करण्यात आली याचादेखील तपास ईडी करीत आहे, जावई यांचा जामीन नाकारल्याने खडसे यांच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now