⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | म्हसावदच्या शेतकऱ्याला घातला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा गंडा

म्हसावदच्या शेतकऱ्याला घातला तब्बल ‘इतक्या’ लाखाचा गंडा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । किसान क्रेडीट कार्डचे काढलेली रक्कम भरण्याच्या नावाखाली म्हसावद शेतकऱ्याची तब्बल १ लाख ६८ हजार ८०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शेतकरी निंबा दशरथ ठाकरे (वय-६८) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शेतकरी निंबा ठाकरे यांना दि. २९ ऑगस्टला एका नंबरवरून फोन आला असता किसान क्रेडीट कार्ड मधून बोलत असल्याची बतावणी करून सांगितले.  तुम्ही तु अजून पर्यंत किसान क्रेडीट कार्डची रक्कम भरलेली नाही. असे सांगितले. त्यावर ठाकरे यांनी सांगितले की आम्ही रक्कम भरलेली आहे. असे सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून कार्डचा नंबर मागितला आणि आलेला ओटीपीच्या मदतीने सुमारे १ लाख ६७ हजार ८०९ रूपये ऑनलाईन काढून घेतले.

दरम्यान दोन दिवसानंतर त्यांनी खात्यातून रक्कम गेल्याचे समजले. निंबा ठाकरे हे गुरूवार २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसीत धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.