कृ.उ.बा.सभापती मुन्नाभाऊ पाटलांच्या प्रयत्नाने विरावली येथे लसीकरण

सप्टेंबर 1, 2021 4:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२१ । यावल तालुक्यातील विरावली येथेआज दि.०१ सप्टेंबर रोजी विरावलीचे माजी सरपंच व शिवसेना जळगाव जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील यांचे प्रयत्नांनी संपूर्ण गावास लसीकरण करण्यात आले.

viravali

लसीकरणाची सुरवात माजी उपसरपंच सुभान तडवी यांना लसीकरणाने करण्यात आली.यात एकूण ६३० ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

याप्रसंगी सरपंच कलीमा तडवी, उपसरपंच मनीषा ईश्वर पाटील, ग्रा.प.सदस्य नथ्थू अडकमोल, इब्राहिम तडवी पोलीस पाटील चंद्रकांत पाटील,माजी पोलीस पाटील शिवाजी आबा पाटील, राजेंद्र पाटील,कौतिक अडकमोल, दामा अडकमोल,मुकुंदा भालेराव, भागवत पाटील,रवींद्र पाटील, समाधान पाटील,सुपडू तडवी, मिलिंद अडकमोल,नसीर तडवी, मेहबूब तडवी,दिनकर पाटील, आबा पाटील, धनराज पाटील, बस्तीलाल पाटील,शिवाजी पाटील,अनिल पाटील उपस्थित होते.तसेच आरोग्य विभागाकडून आरोग्य सेविका मालती चौधरी, आरोग्य सेवक किशोर सहाने, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अमोल अहिरे,आशा सेविका नम्रता पाटील यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now