जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर महापालिकेत सन 2018 मध्ये गिरीश महाजन यांनी सुमारे 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून भारतीय जनता पार्टीचे 57 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेले नगरसेवक यांचा देखील त्यावेळी घोडेबाजार करून व आर्थिक रसद घेऊन ऐन वेळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती. पाच वर्षासाठी जळगावच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला शहराची धुरा सांभाळण्यास दिलेली असताना फक्त अडीच वर्षांमध्ये भाजपाची महानगरपालिकेतील पूर्ण बहुमताची सत्ता गेल्याने गिरीश महाजन यांना आज कसे वाटत असेल असा विचार आमच्या मनात आला. गिरीश महाजन यांनी केलेल्या कर्माची फळे त्यांना मिळत असून त्यामुळेच मनपा बाहेर गेले अशी बोचरी टिका ऍड.विजय भास्करराव पाटील यांनी केली आहे.
गिरीश महाजन मंत्री असताना त्यांना सत्तेचा माज असल्याने जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सन 2015 ते 2020 या कालावधीसाठी आमचे संचालक मंडळ कायदेशीर निवडून आलेले असताना सत्तेच्या मस्तीत पोटी महाजन यांनी आमच्या संस्थेत त्यांना कै.नरेंद्र अण्णा पाटील यांचे विचारांचे संचालक मंडळ असल्याने तेथे त्यांना आर्थिक घोडेबाजार करता येत नसल्याने त्यांनी आम्हाला अडीच वर्षातच संस्थेतून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.
परंतु काळाने आज की माझ्या मनातील अडीच वर्षातच जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून धडा शिकवून त्यांची सत्तेची मस्ती केलेल्या कर्माचे फळ म्हणून आज त्यांना महानगरपालिकेतून बाहेर काढलेले आहे ही त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचे फळ भरण्याची सुरुवात झालेली आहे व यापुढे देखील त्यांना वेळोवेळी केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणार आहे हे येत्या काळात संपूर्ण जळगाव वासियांना तसेच संपूर्ण महाराष्ट्राला कळेलच तरी शेवटी काळ हा नेहमिच श्रेष्ठ असतो हे आज पुन्हा सिद्ध झालेले आहे, असे ॲड.विजय भास्करराव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हे देखील वाचा :
..हा पराजय गिरीश महाजनांच्या गर्विष्ठपणाचा ; खडसेंची जोरदार टीका