दलितवस्ती सुधार योजनेच्या कामांच्या निविदेत अनियमितता, सरपंच, ग्रामसेवकांना नोटीस

ऑगस्ट 28, 2021 12:04 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । रावेर तालुक्यातील ३४ गावांमध्ये दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामांच्या निविदांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. यामुळे या गावातील सरपंच तसेच ग्रामसेवकांना सोमवारी नोटीस बजावून त्यांच्याकडून दहा दिवसात खुलासे मागविण्यात येणार आहे.

dalit vasti jpg webp

गौरखेडा गावातील तक्रारीनुसार पूर्ण रावेर तालुक्यातील ३५ गावांमधील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.बी.रणदिवे यांच्यासह तीन सदस्यीय समितीने चौकशी केली होती. या समितीने आपला अहवाल सादर करीत ३५ गावांमधील ७५ कामांपैकी ३४ गावांमधील ७२ कामांमधील निविदांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे म्हटले होते. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात अशी शिफारसच या समितीने केली होती. तसे पत्र ही ग्रामपंचायत विभागाला दिले होते. त्यानुसार आता संबधित गावांचे सरपंच व ग्रामसेवकांना नोटीसा देऊन त्यांच्याकडून खुलासे मागविण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर.लोखंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी या नोटीसा काढण्यात येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now