मनुदेवीचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात ; एका महिलेचा मृत्यू

ऑगस्ट 28, 2021 11:23 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२१ । मनुदेवीमातेचे दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. तर पाच महिला जखमी झाल्याची घटना आडगाव जवळ घडली. मालती रवींद्र वराळे (रा. खडका) असे मृत महिलेचे नाव आहे

accident

याबाबत असे की, खडका, किन्ही आणि भुसावळ येथील काही भाविक २७ रोजी दुपारी मनुदेवी मंदिरावरून दर्शन घेऊन रिक्षाने येत असताना आडगावच्या दरम्यान एका वळणावर रिक्षाचे संतुलन बिघडल्याने ती पलटी झाली.

यावेळी जखमींपैकी अरुणा मदन सपकाळे (वय ४५ रा.खडका), लक्ष्मी प्रभाकर सपकाळे (वय ४२ रा.खडका), सुनीता महादेव पटोळे, गायत्री महादेव पटोळे आणि ऋषिकेश महादेव पटोळे (१३) सर्व राहणार किन्ही यांना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम तिडके यांनी प्रथमोपचार केले.

यातील मालती वराळे महिलेची प्रकृती गंभीर असल्याने उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. जखमींना तत्काळ रूग्णालयात हलवण्यासाठी वढोदा येथील सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांनी मदत केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now