जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन स.पो.नि.पदी कृष्णा भोये

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या पोलीस अधीक्षक  डॉ.प्रवीणजी मुंढे यांच्या आदेशाने करण्यात आल्या. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या व या पोलिस स्टेशनमध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांची एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे बदली झाली. त्यांच्या जागी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांची नियुक्ती झाल्याचे आदेश काल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत.

पिंपळगाव हरे पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नव्याने आलेले  कृष्णा भोये यांनी बुधवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी  सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. नीता कायटे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कृष्णा भोये हे यापूर्वी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन  कार्यरत होते. पी.एस.आय. डिगंबर थोरात व गावातील ग्रामस्थ यांनी नव्याने पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मनापासून स्वागत केले आहे.

नवीन बदलून येणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा भोये हे पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्याचे स्वागत करण्यात आले.पिंपळगाव पोलीस स्टेशन येथील पी.एस.आय.मा.डिगंबर थोरात यांनी शाल श्रीफळ फुल गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

पिंपळगाव पोलीस स्टेशन  नीता कायते यांचा निरोप समारंभ प्रसंगी व नुकतेच रुजू झालेले कृष्णा भोये सर यांचा सत्कार सकल मराठा समाज, पिंपळगाव हरे, विक्रम पाटील सर , तसेच उपाध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख भगवान पाटील आणि शिवसेना उपतालुका प्रमुख रवी भाऊ गीते,ग्रा.पं.स.अल्लाउद्दीन तडवी सर्व पोलीस कर्मचारी वृंद उपस्तिथ होते,

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button