जळगाव जिल्हा
खडसेंचे कट्टर समर्थक मोहंमद हुसेन यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक तथा राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहंमद हुसेन उर्फ आमीर यांचे आज शनिवारी दुपारी निधन झाले.
मोहंमद हुसेन उर्फ आमीर हे गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथरा खडसे यांचे अतिशय जवळचे समर्थक म्हणून गणले जात होते. त्यांनी काही काळ राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील सांभाळली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.