ट्रक्टर-टॉलीची चोरी करणाऱ्या टोळीचा फार्दफाश

ऑगस्ट 20, 2021 6:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून ट्रक्टरसह टॉलीची चोरी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. संजय तुकाराम धनगर (वय-४२), कलमी कमरोद्दिन शेख (वय-४२), प्रमोद सुकदेव महाजन (वय-३८) आणि गणेश वसंत महाजन (वय-३५) असे अटक केलेल्या चारही संशयितांची नावे आहेत. दरम्यान, पुढील कारवाईसाठी चौघांना यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

troli

याबाबत असे की, मुक्ताईनगर, रावेर, यावल आणि जामनेर तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून ट्रक्टर व ट्रॉलींची चोरीचे प्रमाण वाढले आहे. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तयार केलेल्या पथकात सहाय्यक फौजदार विजय पाटील, राजेंद्र पाटील, अशोक महाजन, रविंद्र गायकवाड, वसंत लिंगायत, नरेंद्र वारूळे, प्रदीप पाटील, जयवंत चौधरी, विजय चौधरी, दिपक पाटील, उमेशगिरी गोसावी, किरण चौधरी, योगेश वराडे यांना रवाना केले.

आज धरणगाव आणि चोपडा तालुक्यात ट्रॉली चोरी करण्याच्या प्रयत्नात असतांना टोळीचा मोरक्या संजय धनगर याला धरणगाव येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने कलमी शेख, प्रमोद महाजन, गणेश महाजन या तीन सहकाऱ्यांची नावे सांगितले. चौघांकडून आतापर्यंत एकुण चोरी केलेल्या ९ ट्रॉल्या आणि १ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. दरम्यान चौघांना ट्रॉली किंवा ट्रॅक्टर नाही मिळाली तर घरफोडी किंवा डीपीची चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. चौघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now