जळगाव लाईव्ह न्यूज । मयुर घाडगे । गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने चाळीसगाव तालुक्यात दांडी मारल्यामुळे तालुक्यात पिकाची परिस्थिती गंभीर बनत चालली होती. चाळीसगाव तालुक्यात सुमारे 90 हजार हेक्टर 100 टक्के पेरणी झाली होती.
या वर्षीच्या आतापर्यंतचा मान्सून जोर कमी प्रमाणात असल्यामुळे पिकांचाही जोर हा काही अंशीं कमी झाला होता. जून व जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पिकाची स्थिती चांगली असताना जुलैचा शेवटचा आठवडा व ऑगस्टचा पहिल्या दोन आठवड्यात पावसाने दांडी मारली. त्यामुळे मक्का व कपाशी सह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता होती.
अशातच पावसाअभावी पिकांवर परिणाम होत होता. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची व्यवस्था होती त्यांनी पाणी देण्याची ची धडपड चालू केली होती.परंतु ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नसल्याने तो शेतकरी आकाशाकडे डोळे लावून होता. त्यामुळे दुष्काळाचे सावट डोकावत असतानाच सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे मग म्हणजे 16 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या पावसाने बळीराजा आनंदला आहे. त्यात मंगळवारी पासून पाऊस सतत सक्रिय झाल्याने तालुक्यात सर्वदूर पाऊस जोरदार हजेरी लावण्याने सर्व पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
गेल्या 24 तासात 59 मी.मी. पाऊस तीन मंडळात अतिदृष्टी झाली आहे. मोठ्यात खंडानंतर आलेल्या भिज पावसाने शेतकरी राजा सुखावला असून गेल्या 24 तासात चाळीसगाव तालुक्यात 59.71 मी.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे .आता पर्यंत तालुक्यात 461.97 मी.मी इतका पाऊस झाला आहे. तालुक्यातील सात मंडळापैकी 24 तासात चाळीसगाव, बहाल,खडकी या तीन मंडळात पाऊस 60 मी.मि पेक्षा अधिक झाला आहे.
पावसाच्या दांडीमुळे चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्पनाही मोठा फटका बसला असून अर्धा जिल्ह्याला वरदान ठरलेला गिरणा धरणाला आज अखेर केवळ 40.49 टक्के पाणीसाठा आहे . गत वर्षी याच तारखेला गिरनेचा पाणीसाठा 55.40 टक्के होता. म्हणजेच या वर्षीच्या तुलनेने गतवर्षी पाणीसाठा गिरणीचा 15 टक्के अधिक होता.तसेच तालुक्यातील इतर 14 प्रकल्पनाची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे .
चाळीसगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासात मंडळ निहाय पडलेला पाऊस
चाळीसगाव – 66 मी.मी
बहाल – 68 मी.मी
मेहुनबारे- 45 मी.मी
हातले – 60 मी.मी
तळेगाव – 50 मी.मी
शिरसगाव – 60 मी.मी
खडकी – 69 मी.मी
सरासरी पर्जन्यमान – 59.71मी.मी
आता पर्यंत झालेला पाऊस – 461.97 मी.मी