महाराष्ट्र राज्य लोककलावंत निवड समितीवर विनोद ढगे यांची निवड

ऑगस्ट 18, 2021 7:58 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज  । १८ ऑगस्ट २०२१ ।  कोविड महामारीत कलेवर पोट असणाऱ्या व कलेशिवाय उदरनिर्वाहाचे कुठलेच साधन नसलेल्या लोककलावंतांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शासन विविध स्तरावर विचार करत आहे त्या अनुषंगाने लोककलावंताद्वारे कोरोना विषयक जनजागृती करून त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य स्तरावर लोककलावंत निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Untitled design 20

या समितीत राज्यभरातून लोककलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, तज्ञ व लोककलावंताचा या समितीत समावेश केला आहे. त्यात जळगावचे लोकनाट्य कलावंत खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जळगावसह धुळे, नंदुरबार, नासिक, नगर या जिल्ह्यातील लोककलावंताची निवड व पडताळणी करून शासनाच्या या मदतीपासुन कुठलाही लोककलावंत वंचित रहाणार नाही यांची दक्षता घेतली जाणार आहे.

कोविडच्या महामारीत गेली दिड वर्ष राज्यातील विविध लोककला क्षेत्रातील कलावंत अत्यंत हलाखीचे जिवन जगत आहे. यासाठी शासनस्तरावरून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील कलावंतांच्या संख्येनुसार प्रत्येक कलावंताला रू पाच हजार रुपयांची कोविड जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे. जिल्हयातील जे कलावंत या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छितात त्या कलावंतानी त्वरीत आपली नावे समिती सदस्यांकडे नोदंवावी, असे अवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now