नाल्यात वाहून आला तरुणीचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

ऑगस्ट 18, 2021 3:21 PM
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । शहरातील हरीविठ्ठल नगरात असलेल्या शामराव नगरात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका अल्पवयीन तरूणी नाल्यात वाहून आली. परिसरातील नागरिक नाल्यात साप पाहत असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे. एक डॉक्टर आणि काही तरुणांच्या मदतीने तरुणीला बाहेर काढण्यात आले असून तिच्याकडून काहीही प्रतिसाद नसल्याने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हरीविठ्ठल नगरातील नाला दुथडी भरून वाहत आहे. बुधवारी दुपारी शामराव नगर परिसरातील नाल्यात एक साप दिसल्याने परिसरातील नागरिक साप पाहत होते. त्याच वेळी नाल्यात एक १५-१६ वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत वाहत आली. नागरिकांचे लक्ष जाताच त्यांनी लागलीच परिसरातील एका डॉक्टरांना बोलविले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता कोणताही प्रतिसाद नव्हता. परिसरातील काही तरुणांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Untitled design 17 jpg webp

दरम्यान, तरुणीकडून काहीही प्रतिसाद नसल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी अंती तिला मृत घोषित करण्यात आले. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणी हरीविठ्ठल नगरातील रहिवासी असून कालपासून बेपत्ता असल्याचे समजते. तरुणीचा घातपात तर झाला नसावा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/3008624956089396/

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now