जळगाव जिल्हा

रायसोनीनगर येथे” श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताह ” सुरू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज। १७ ऑगस्ट २०२१ । मोरपंख बहुउद्देशीय संस्थेतर्फे 16 ऑगस्टपासून ” श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरुवात झाली आहे. या कथेचा प्रारंभ १६ रोजी दुपारी झाला असून कथाकार श्री.स.गु.शा.विश्वप्रकाशदासजी वेदांताचार्य हे आपल्या  वाणीद्वारे प्रबोधन करीत आहेत.भगवान श्री स्वामीनारायण व भगवान श्री सिद्धेश्वर महादेव यांच्या असीम कृपेने तसेच प.पु.ध.धु.१००८ आचार्य राकेशप्रसादजी महाराज आणि स.गु.शा. नीलकंठदासजी तसेच स.गु.शा. धर्मप्रसाददासजी तथा स.गु.शा.ज्ञान प्रकाशदासजी व स.गु.शा.भक्तीप्रकाशदासजी,स.गु.कोठारी स्वा..गोविंदप्रसाद दासजी , जळगाव आणि संत मंडळ यांच्या आशीर्वादाने या कोरोना आदी रोगांपासून मुक्तता मिळविण्यासाठी सकारात्मकतेने पवित्र श्रावण महिन्यात दि.१६ तें २२ ऑगस्ट रविवारपर्यन्त श्री शिवपुराण ज्ञानयज्ञ सप्ताह संगीतमय पारायणाचे व रुद्रवहनचे आयोजन करण्यात आले आहेत.
या कथेचे वक्ते स.गु.शा.श्री. विश्वप्रकाशदासजी वेदांताचार्य हे असून त्यांचा कथा श्रवणाचा लाभ परिसरातील भाविक भक्त घेत आहेत.कथेप्रसंगी भाविक मंडळी तल्लीन होऊन जात आहे.कथेचे यजमान जळगावचे आमदार राजुमामा भोळे , नयना गणेश टोके , गणेश यशवंतराव टोके , मस्कावद आणि चंद्रकांत पोपट पाटील , सातोद हे आहेत.
     यासाठी मनोज फेगडे , पुनम फेगडे , प्रविण गुरुजी ,धुळे खुशाल पाटील , सावदा , कलावंत व जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभत आहे ; ही कथा लाईव्ह असून भाविक भक्तांसाठी आहे.त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरपंख बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button