जळगावात बंद घर फोडले ; १ लाख २३ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास

ऑगस्ट 13, 2021 2:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख २३ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील दांडेकर नगरात उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

याबाबत असे की, शहरातील दांडेकर नगरात राहणारे नरेंद्र दामोदर पाटील (वय-४७)  हे कामाच्या निमित्ताने १० ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. १० ऑगस्ट दुपारी ३ ते १२ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले १ लाख १४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ९ हजार रूपयांची रोकड असा एकुण १ लाख २३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

याप्रकरणी नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now