दिव्या भोसलेंच्या पाठपुराव्याला यश, पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठपुस्तके वाटप

ऑगस्ट 13, 2021 10:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके वाटप केली जात. मात्र या वर्षी कोरोना संसर्ग उतरत्या कडेवर असताना प्रत्यक्ष शाळेला वा झाली नव्हती. पण ऑनलाईन अभ्यास सुरू असल्याने पुस्तके मिळाली नव्हती.

divya bhosale

या विषयावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग तसेच डॉक्टर राजेंद्र सपकाळे उपशिक्षण जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावला. त्याच पार्श्वभूमीवर लवकरच जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या 4 लाख 22 हजार 403 लाभार्थी विद्यार्थ्यांना लवकरच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे.

नाशिक विभागाकडून पाठ्यपुस्तकांच्या वितरण सुरुवात झाली असून लवकरच केंद्र स्तरावर वितरणाला सुरुवात होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा संपली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now