⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | …म्हणून आ. मंगेश चव्हाणांसह इतरांवर गुन्हा दाखल

…म्हणून आ. मंगेश चव्हाणांसह इतरांवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । आज चाळीसगाव येथे बैलगाडा शर्यंत बंदी विरोधात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतुर्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात कोरोना संचारबंदी असतानाही आंदोलन केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, अखील भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, चाळीसगाव या संघटनेचे अध्यक्ष दीपक काशिनाथ गायकवाड यांना प्रशासनाने सध्या कलम ३७ (अ) लागू करण्यात आल्यामुळे आंदोलन करू नये असे सूचविले होते. मात्र या नियमांचे उल्लंघन करून आज शहरातील घाट रोडापासून मोर्चा काढण्याची तयारी केली असता उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना पुन्हा सूचना करूनही हे आंदोलन करण्यात आले.

या अनुषंगाने या सर्वांच्या विरूध्द भादंवि कलम १४३, १८८, २६९, २७०, २८९, ३४१ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (अ) चे उल्लंघन केल्या प्रकरणी १३५, ११७ आणि ११७ या कलमांच्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस कर्मचारी पंढरीनाथ दशरथ पवार यांच्या फिर्यादीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पो. ना. मुकेश पाटील हे करीत आहेत.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.