गुन्हेयावल

सातपुड्याचा जंगल पिंजत यावल पोलिसांनी काढल्या चोरीच्या २० दुचाकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । यावल पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाघझिरा येथून ताब्यात २० वर्षीय संशयिताला अटक केली होती. पोलिसांच्या चार पथकांनी पाच दिवस सातपुडा जंगल पिंजून काढून २० दुचाकी हस्तगत केल्या. चोरट्याने दुचाकी जंगलात लपवून ठेवल्या होत्या.

दहिगाव येथील संदीप दगडू महाजन यांच्या दुचाकी चोरी प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल आहे. त्यांची दुचाकी २३ जूनला चोरीस गेली होती. या प्रकरणात पोलिसांनी वाघझिरा येथील अर्जुन नांदला पावरा (वय २०) यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर सर्व प्रकार समोर आला. अर्जुन पावरा याने चोरी केलेल्या दुचाकी सातपुड्याच्या अभयारण्यात लपवल्याचे सांगितले. यानुसार पाेलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी संशयित आरोपीच्या सांगण्यानुसार पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत सातपुड्यातील सहा आदिवासी पाड्यांच्या परिसरातून त्याने आतापर्यंत चोरलेल्या २० दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. त्या सर्व पोलिस ठाण्यात आणल्या.

यासाठी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, एपीआय अजमतखान पठाण, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान, सिकंदर तडवी, हवालदार अस्लम खान, संजय तायडे, सुशील घुगे, राहुल चौधरी, राजेश वाडे, रोहील गणेश, गणेश ढाकणे, भूषण चव्हाण, विजय जावरे, संदीप काळी, शेख तौसिफ यांच्या पथकाने सातपुड्यातील विविध भागांमध्ये जाऊन या सर्व दुचाकींचा शोध घेतला. दुचाकी चोरी करणारा अर्जुन पावरा याचे अजून कोणी साथीदार आहेत का? याचा तपास सुरू आहे. तसेच या दुचाकी मालकांचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. दुचाकी चोरीला गेलेल्या मूळ मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह कर्मचारी सुशिल घुगे यांना भेटावे, असे सांगितले.जळगाव, अमळनेर, नशिराबाद येथून दुचाकी चोरल्याची संशयिताने दिली माहिती

दुचाकी चाेरीच्या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन पावरा यास ६ ऑगस्टला अटक केल्यानंतर १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्याला मंगळवारी न्यायाधीश एम.एस. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता पुन्हा चार दिवसांची म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. पुढील तपास हवालदार अस्लम खान करत आहे. दरम्यान, दुचाकी चाेरी संदर्भात अद्याप तपास सुरू आहे. पावराने सांगितल्याप्रमाणे सातपुड्याच्या अभयारण्यात दुचाकींचा शोध घेण्यासाठी जाताना खडतर प्रवास करावा लागला. यात आंबापाणी येथे पोलिसांचे वाहन जंगलात अडकले. तेव्हा आदिवासी बांधवांची मदत घेण्यात आली. दरम्यान, आरोपीने या दुचाकीने जळगाव, अमळनेर व नशिराबाद हद्दीत चोरल्या आहे.

चोरलेल्या २० दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. त्या सर्व पोलिस ठाण्यात आणल्या. यासाठी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, एपीआय अजमतखान पठाण, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान, सिकंदर तडवी, हवालदार अस्लम खान, संजय तायडे, सुशील घुगे, राहुल चौधरी, राजेश वाडे, रोहील गणेश, गणेश ढाकणे, भूषण चव्हाण, विजय जावरे, संदीप काळी, शेख तौसिफ यांच्या पथकाने सातपुड्यातील विविध भागांमध्ये जाऊन या सर्व दुचाकींचा शोध घेतला. दुचाकी चोरी करणारा अर्जुन पावरा याचे अजून कोणी साथीदार आहेत का? याचा तपास सुरू आहे. तसेच या दुचाकी मालकांचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. दुचाकी चोरीला गेलेल्या मूळ मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह कर्मचारी सुशिल घुगे यांना भेटावे, असे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button