जवखेडे सिम शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी वैशाली पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यातील जवखेडे सिम येथील शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्यांची निवड पालकांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात पार पडली. यावेळी मुख्याध्यापक धनराज पाटील यांच्यासह सर्व शिक्षक हजर होते.
सदर निवडणुकीत निवडून आलेले सदस्य वैशाली प्रदीप पाटील अध्यक्ष,उज्वला दिनेश वैराळ उपाध्यक्ष, शोभाबाई सुभाष पाटील सदस्य,अर्चना गुलाब पाटील सदस्य, राजेंद्र बाबुलाल चौधरी सदस्य, वसंत अर्जुन नावी सदस्य,ज्ञानेश्वर सुभाष पाटील सदस्य, शरद ज्ञानेश्वर पाटील सदस्य,ईश्वर लोटन पाटील सदस्य, सुभाष जंगलो बिल सदस्य.
सदर निवडीबद्दल निवडून आलेल्या सदस्यांचे शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचे देखील आश्वासन दिले.