आनंदाची बातमी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, आजचे नेमके दर काय?

डिसेंबर 19, 2024 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत महत्वपूर्ण बदल दिसले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंच्या किमतीत थोडे चढउतार दिसले. दरम्यान, जळगाव सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झालीय. तरी आत्ताचे दर पाहता, सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार असाल तर आजचे नेमके दर काय आहेत जाणून घेऊ…

gold silver 2 jpg webp

जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले. बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव १५० रुपयांनी घसरला. यापूर्वी मंगळवारी ४०० रुपयांची घसरण झाली होती. गेल्या दोन दिवसात सोने ५५० रुपये प्रति तोळ्याने घसरले. दरम्यान, आज गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा प्रति तोळ्यांचा भाव विनाजीएसटी ७६,७५० रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर आहेत. यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव विनाजीएसटी ९१००० रुपये इतका आहे.

गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले होते, परंतु त्यानंतर 1600 रुपयांची घसरण दिसली. गेल्या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली होती, परंतु नंतर 4,000 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्यात चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून चांदीची कीमत स्थिर आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now