वावडदा शिवारात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त, मुद्देमालासह एकाला अटक

ऑगस्ट 6, 2021 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करत सुमारे २ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात घडली. प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रमन देवरे (वय-५०) असे अटक करण्यात आल्याचे नाव आहे.

daru crime news

याबाबत असे कि, वावडदा शिवारातील म्हाळसाई क्रशींग कंपनीजवळ बनावट दारूचा कारखाना सुरू आल्याची गोपनिय माहिती जळगाव राज्य उत्पादक शुल्क विभागाचे पोलीस अधिक्षक सिमा झावरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून त्या पथकाने म्हाळसाई क्रशींग कंपनीजवळ एका घरावर त्यांनी छापा टाकला. त्यात त्यांना बनावट कारखाना सुरू असल्याचे दिसून आले.

यासंदर्भात येथील वाचमन व त्याची पत्नी राहत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली. संपुर्ण तीन ते चार खोल्यांची तपासणी केली असता त्याठिकाण बनावट दारू तयार करण्यासाठी कच्चे साहित्य, काचेच्या बाटल्या, बुच, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे जार, कॅन्स, बनावट दारूच्या सीलबंद बाटल्या असा मुद्देमाल आढळून आला.

असा आढळून आला मुद्देमाल?

यात १ लाख ३१ हजार ४६० रूपये किंमतीच्या बनावट देशी टँगो (१८०एमएल)च्या २ हजार १९१ बाटल्या, ७५ हजार ३०० रूपये किंमतीच्या मॅक्डॉल नं१ (१८०एमएल)च्या ५०२ सीलबंद बाटल्या, ३ हजार ५०० रूपये किंमतीच्या दोन ३५ लिटर ड्रम (मद्यार्क भरलेला), १४ हजार किंमतीचे बॉटलिंग मशिन, १६ हजार रूपये किंमतीचे बुच, ७०० किमतीच्या रिकाम्या बाटल्या, मद्यार्कचे दोन ड्रम, उपकरण, इतर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू असा एकुण २ लाख ६० हजार १० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी वाचमन संजय देवरे याला पोलीसांनी अटक करण्यात आली असून दोन जण फरार आहे. तिघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

नाशिक विभागीय आयुक्त अर्जून ओहोळ, पोलीस अधिक्षक सिमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे मुख्य निरीक्षक सी.एच.पाटील, दुय्यम निरीक्षक सत्यविजय ठेंगडे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, आनंद पाटील, अजय गावंडे, योगेश राठोड, नितीन पाटील, मुकेश पाटील, कुणाल सोनवणे यांनी ही कारवाई केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now