शिरसोलीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या

ऑगस्ट 4, 2021 2:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । शिरसोली प्र.न. अशोकनगरातील ५२ वर्षीय प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. कैलास विठ्ठल सोनवणे असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, शिरसोली प्र.न. अशोकनगरमधील कैलास सोनवणे यांनी छताच्या कडीला ओढणी बाधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रात्री १०:३० वाजता पत्नी उठली तेव्हा ही घटना समोर आली. यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे गल्लीतील नागरीकांनी गर्दी केली.

यावेळी शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना बोलविले यांनी जळगाव शासकीय महाविद्यालयात व रुग्णालयात कैलासला आनले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. कैलास हा दारुच्या व्यसनाधीन होता. यामुळे त्याला नैराश्य आल्यामुळे ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जळगाव एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड, राजु ठाकरे करीत आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now