बीएचआर प्रकरण : ‘या’ दोघांचा जामीन मंजूर

ऑगस्ट 4, 2021 11:53 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२१ । राज्यभर गाजलेल्या बीएचआर घोटाळा प्रकरणात आणखी दोन जणांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेत असलेले विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जितेंद्र कंडारे याच्या जामीनावर सुनावणी सुरू आहे.

bhr scam

बीएचआर घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी जळगावात छापेमारी करत विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांच्यासह सहा संशयिताना अटक केली होती. यावेळी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर सर्वांची न्यायालयात कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून संशयित येरवडा कारागृहात बंदी होते.

यातील विवेक ठाकरे याने पावत्या मॅचिंग करण्याचे काम केले. तर, सुजीत वाणी या पतसंस्थेच्या कर्मचार्‍याने ठेविदारांना धमकावल्याचा त्यांचावर आरोप आहे. या दोघांनी आधी जामीनासाठी केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. यानंतर या दोघांनी पुण्याच्या विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केले.

यावर सुनावणी पूर्ण होऊन मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर दोघांची ६ ऑगस्ट रोजी कारागृहातून सुटका होऊ शकणार आहे.

दरम्यान, याच प्रकरणात अटकेत असलेल्या जितेंद्र कंडारे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तर मुख्य संशयित सुनील झंवरने तिसर्‍यांदा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून या दोघांच्या अर्जांवर सुनावणी सुरू आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now