डॉ.अब्दुल गफार मलीक फाऊंडेशनतर्फे पूरग्रस्तांना ३१ हजारांची मदत

जुलै 30, 2021 9:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी घरगुती वस्तूंचे १६ हजार किट्स वाटण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या या कार्याला हातभार लावत जळगावातील डॉ.अब्दुल गफार मलीक फाऊंडेशनने ३१ हजारांची मदत केली आहे.

gaffar malik foundation 31 k help

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आज पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व.डॉ.अब्दुल गफ्फार मालिक यांचे चिरंजीव एजाज मलिक यांनी डॉ.अब्दुल गफ्फार मालिक फाउंडेशनतर्फे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे रुपये ३१ हजारांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, आ.अनिल भाईदास पाटिल, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटिल, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप सोनावणे, मा.आ. जगदीश वळवी, रोहिणी खडसे, महिला जिल्हाअध्यक्ष वंदना चौधरी, महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटिल, संजय पवार, संजय गरुड़, उन्मेष पाटिल, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, नामदेव चौधरी, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटिल, योगेश देसले, अशोक लाड़वंजारी, विनोद देशमुख, स्वप्निल नेमाड़े, रविंद्र नाना पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now