जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२१ । पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेकांनी ”वृक्षवल्ली आम्हा सोयरे” हि मोहीम हाती घेतली असून “फुलवारी” वृक्षारोपण प्रकल्पाला आज पासून शुभारंभ झाला असून झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला आहे.
कोरोना काळात अनेक वेळा ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत होता अनेक वेळा ऑक्सिजन अभावी रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं परंतु ऑक्सिजन मिळवण्याच सर्वात उत्तम आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे ”झाडे लावा झाडे जगवा” झाडांची लागवड करून त्यांची निगा राखणे
“फुलवारी” वृक्षारोपण प्रकल्पाचा वृक्षारोपण शुभारंभ आज महानगरपालिका आयुक्त श्री सतीश कुळकर्णी यांच्या हस्ते मेहरूण तलाव परिसर येथे फुलांचे वृक्ष लावून करण्यात आला.या वेळी उपयुक्त श्री पंकज पाटील साहेब,श्री उदय पाटील साहेब,उपाध्याय परिवार,श्री जहांगीर वकील , रमेशजी जाजू जितुभाई रावलांनी, श्री भानुदास व सौं हेमलता वाणी, आनंद मराठे, विस्वासराव मोरे, सौ. संध्या वाणी, सौ. निलोफर देशपांडे, संतोष क्षीरसागर,देविदास ढेकळे मनोज चौधरी, भैया व भरत सोनोवणे व मित्र मंडळ व वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.