जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२१ । राज्याचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची सर्पमित्र म्हणून नवीन पुन्हा ओळख समोर आली आहे. मंगळवारी रस्त्यावर गर्दी पाहून थांबलेल्या आ.महाजन यांनी पाच फूट लांबीचा साप पकडला आणि त्याला सुरक्षितरित्या जंगलात सोडले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे.
माजी मंत्री आ.गिरीश महाजन हे मंगळवारी रात्री आठ वाजता सोनेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे येत होते. त्यावेळी त्यांना जामनेर शहरातील सुपारी बागेसमोर वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसली. काही भांडण तर झाले नसावे यासाठी खात्री करण्यासाठी ते थांबले. वाहनातून उतरताच त्यांना सुमारे पाच फुट लांबीचा साप रस्ता ओलांडत असल्याचे दिसले. वाहनाखाली चिरडून साप मारला जाऊ शकतो, हे लक्षात घेत महाजन यांनी पुढाकार घेतला. परिसरातील काही जणांच्या मदतीने महाजन यांनी काठीच्या साहाय्याने सापाला पकडले. सापाला पळासखेडे येथील जंगलात सोडण्यात आले. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/195949882496381