गुन्हेयावल

डोंगर कठोरा येथील खळ्याला भीषण आग ; २ म्हशी ठार, अनेक गुरे गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका खळ्याला लागलेल्या भीषण आगीत २ म्हैशी होरपळून ठार झाले तर अनेक गुरे गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवारी घडलीय.  या आगीत सुमारे चार लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे.

याबाबत असे की, येथील शेतकरी युवराज गणपत भिरुड यांच्या खळ्याला आज सकाळी आग लागली. या आगीत २ म्हैशी होरपळून ठार झाले. तर ५ म्हैशी गंभीर जखमी झाल्या आहेत. काही गुरांचे डोळे जळाले आहे. दरम्यान, खळ्यात गुरांनसाठी साठवून ठेवलेला चारा देखील जळून खाक झाला आहे.

या आगीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ४ लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीची घटना कळताच आग विझवण्यासाठी गावातील पोलीस पाटील राजरन्त आढाळे कोतवाल विजय आढाळे,  ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी व गावकरी यांनी आग विझवली.

घटनास्थळी ग्रामविकास अधिकारी सी.जी. पवार, तलाठी वसिम तडवी, सरपंच नवाज तडवी, उपसरपंच धनराज पाटील, डॉ किशोर बाऊस्कर, ग्रामपंचायत क्लार्क प्रदीप पाटील यांच्या उपस्थित घटनेचा  पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान, ही आग कश्यामुळे लागली हे अद्यापही कळू शकले नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button