पहूर पाळधीजवळ भीषण अपघात, जळगावच्या दोघांसह तिघे ठार

जुलै 12, 2021 7:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर पाळधी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत तिघे ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. भीषण अपघातात जळगावातील दुचाकीस्वार पंकज मोहन तायडे वय-३२ रा.कला वसंत नगर, असोदा रेल्वेगेटजवळ, धनंजय गंगाराम सपकाळे वय-४२ रा.स्टेट बँक कॉलनी आणि चारचाकी चालक प्रवीण प्रकाश पाटील वय-३८ रा.भरडी हे तिघे ठार झाले आहे.

pahur accident 3 dead

शेंदुर्णी येथुन फॉर्चून फायनान्स या बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे दोन्ही (एम.एच.१९ डी.आर.१४१९) युनिकॉन या दुचाकीने जळगावकडे परत येत असतांना जळगाहुन पहुरकडे जाणार्‍या चारचाकीने (एम.एच.१९ सीयु.७१६१) दुचाकीला पाळधी पासुन एक किलोमीटर अंतरावर बळीराजा ढाबा जवळ जोरदार धडक जोरदार दिली. दुचाकीवरील पंकज तायडे व धनंजय सपकाळे हे जागीच ठार झाले. तर चारचाकी चालक प्रविण पाटील यांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पहूर पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे. मयतांच्या नातेवाईक यांनी जळगाव सिव्हिल हाँस्पिटल मध्ये आक्रोश केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now