
जळगाव लाईव्ह न्यूज । दिवाळीनंतर जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्थिर असलेल्या दरांमध्ये आज वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा नवा झटका बसला आहे. बाजार सुरू होताच सोन्याच्या भावात प्रति तोळा ८०० रुपयांची वाढ झाली असून, सोन्याचा दर आता १ लाख ४२ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचा भाव १ लाख ४२ हजार रुपये प्रति तोळा होता. त्यात आज झालेल्या वाढीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा वाढीची दिशा पकडली आहे.
चांदीच्या बाजारातही तेजीचे चित्र पाहायला मिळाले. चांदीच्या दरात प्रति किलो १ हजार रुपयांची वाढ होऊन भाव १ लाख ८९ हजार रुपयांवर गेला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीचा दर १ लाख ८८ हजार रुपये प्रति किलो होता.





