जळगाव जिल्हानोकरी संधी

जळगावच्या सैनिकी वसतिगृहात भरती जाहीर; पात्रता काय? अर्ज कुठे करायचा?

जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अधिपत्याखाली कार्यरत सैनिकी मुलांचे वसतिगृह, जळगाव येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर वसतिगृह सहायक अधीक्षक (पुरुष) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही पद माजी सैनिक संवर्गातून भरण्यात येणार असून, माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे.

या पदासाठी एक जागा असून, माजी सैनिक प्रवर्गातील MACP हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले हवालदार/JCOs यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच मराठी व इंग्रजी टायपिंग, MS Office आणि MS Excel चे ज्ञान असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील
इच्छुक उमेदवारांनी आधारकार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन फोटो तसेच माजी सैनिकांसाठी ओळखपत्र (I Card) व डिस्चार्ज बुक या आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत. मुलाखतीची तारीख नंतर कळविण्यात येईल.

निवड करण्याचे अथवा कोणताही अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button