
जळगाव लाईव्ह न्यूज | मध्यपूर्वेतील संघर्षाचे पडसाद जागतिक बाजारपेठेवर उमटत असून, तेल, इंधनासह सोने आणि चांदीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दरम्यान, जळगावच्या सराफ बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे, तर सोन्याचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आजच्या दरांकडे लागले आहे.
जळगावच्या सराफ बाजारात आज चांदीच्या दरात प्रतिकिलो २ हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. या घसरणीनंतर जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख १ हजार ८८० रुपये प्रतिकिलो झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांचे बाजारातील घडामोडींकडे लक्ष आहे.
सोन्याचे दर स्थिर
दुसरीकडे, जळगावच्या सराफ बाजारात जीएसटीसह सोन्याचा भाव १ लाख ४७ हजार ८४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. चांदीच्या दरात घसरण झाली असली, तरी सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.





