
जळगाव लाईव्ह न्यूज । भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ आणि मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता शितल कुमार देशमुख डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नदीम शेख सर यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून करण्यात आली. आजचे प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नदीम शेख सर यांनी वाचनाविषयी विद्यार्थिनींना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थिनींना नियमित वाचनाचे महत्त्व पटवून दिले पुस्तके ही ज्ञान विचार आणि व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी विविध पुस्तके वाचून वाचनाचे महत्त्व जाणून घेत ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करून ज्ञान समृद्ध होण्याचे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ कविता राहुल भोरटके यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीमती मीनल राणे, प्रा.जयश्री कुलकर्णी,प्रा कोमल भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





