जळगाव जिल्हा

जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

सोल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन संशोधनपत्रांचे सादरीकरण; महादेव हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी नोंदवत महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे आयोजित प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत तीन संशोधनपत्रे सादर केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राची जागतिक स्तरावर दखल घेण्याची संधी मिळाली आहे.

डॉ. कमलेश तायडे यांनी सोल येथे झालेल्या इंटरनॅशनल पार्किन्सन अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला. या परिषदेत जगभरातील न्यूरोलॉजिस्ट, वैद्यकीय संशोधक आणि विविध देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर तीन संशोधनपत्रांचे सादरीकरण करून डॉ. तायडे यांनी आपल्या संशोधनकार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणी केली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी डॉ. तायडे यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) आंतरराष्ट्रीय प्रवास अनुदान प्राप्त झाले. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत जागतिक परिषदेत सहभागी होण्याची मिळालेली ही संधी त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

KT

जागतिक संशोधनाचा रुग्णसेवेला लाभ न्यूरोलॉजी क्षेत्रात सातत्याने विकसित होणारे संशोधन, आधुनिक निदानपद्धती आणि उपचारांमधील प्रगती यांची माहिती अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून मिळते. जगभरातील तज्ज्ञांशी विचारांची देवाणघेवाण आणि संशोधनातील नवे दृष्टिकोन समजून घेण्यामुळे स्थानिक पातळीवरील रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यास मदत होते. डॉ. तायडे यांच्या या सहभागामुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.डॉ. कमलेश तायडे यांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस व एमडी मेडिसिनचे, तर नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून डीएम न्यूरोलॉजीचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांच्या या यशामुळे महादेव हॉस्पिटल, जळगावच्या नावलौकिकात भर पडली असून, त्यांच्या कामगिरीचे वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत असतानाही जागतिक संशोधनाच्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, हे डॉ. तायडे यांच्या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे.जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या यशामुळे महादेव हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button