
जळगाव लाईव्ह न्यूज । गुन्ह्याचा तपास, आरोपीला अटक आणि चार्जशीट दाखल करण्याबरोबरच आता आरोपीची न्यायालयीन पार्श्वभूमी, प्रलंबित गुन्हे, जामीनस्थिती आणि न्यायालयीन कार्यवाही यावरही पोलिसांना अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. जळगाव पोलिस दलातील विविध स्तरांवर ‘Court Checker App’चे पेड व्हर्जन दोन वर्षांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जळगाव पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तसेच संबंधित युनिट्सना मिळून ५० कोर्ट चेकर अॅपचे पेड व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वीच संबंधित यंत्रणांना डेडिकेटेड सिमकार्ड आणि टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक न्यायालयीन माहिती डिजिटल माध्यमातून जलदगतीने मिळविणे शक्य होणार आहे.
आरोपीची संपूर्ण न्यायालयीन माहिती एका क्लिकवर
‘Court Checker App’च्या माध्यमातून एखाद्या आरोपीविरुद्ध यापूर्वी किती गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे, कोणती प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि कोणत्या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाला आहे, याची माहिती मिळविण्यास मदत होणार आहे.तसेच संबंधित प्रकरणाची पुढील सुनावणीची तारीख, न्यायालयीन कार्यवाही आणि केसची प्रगती यावरही लक्ष ठेवता येणार आहे.
Repeat Offenders शोधण्यास मदत
वारंवार गुन्हे करणाऱ्या Habitual किंवा Repeat Offendersची न्यायालयीन माहिती एकत्रितपणे उपलब्ध झाल्याने अशा आरोपींवर लक्ष ठेवणे पोलिसांना अधिक सोपे होणार आहे. आरोपीचा पूर्वइतिहास आणि त्याच्यावरील प्रलंबित प्रकरणांची माहिती तपास अधिकाऱ्यांना तपासाची दिशा ठरविण्यासाठीही उपयुक्त ठरू शकते. तसेच विविध गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड असलेल्या आरोपींच्या न्यायालयीन हालचालींची माहिती मिळाल्यास त्यांच्या शोधासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो.
Charge-sheet आणि केसच्या प्रगतीवर वरिष्ठांचे लक्ष
गुन्ह्याची चार्जशीट दाखल झाली आहे का, न्यायालयात पुढील कार्यवाही काय आहे, प्रकरण कोणत्या टप्प्यावर आहे, याचे Monitoring वरिष्ठ अधिकाऱ्यांना करता येणार आहे. त्यामुळे तपासातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेणे अधिक सुलभ होणार आहे. तपास अधिकारी, कोर्ट पैरवी अधिकारी आणि सरकारी अभियोक्ता यांच्यात आवश्यक माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीही या डिजिटल प्रणालीचा उपयोग होऊ शकतो.
‘Crime Data + Criminal Intelligence + Court Data’वर भर
आधुनिक पोलीसिंगमध्ये केवळ FIR आणि तपासाची माहिती पुरेशी नसून आरोपीचा Crime–Court–Bail–Conviction History विचारात घेणे महत्त्वाचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर Court Checker App हे पोलिसांसाठी केवळ न्यायालयीन माहिती पाहण्याचे साधन न राहता Criminal Intelligence आणि Investigation Support System म्हणून उपयुक्त ठरू शकते.
आरोपीचा गुन्हेगारी व न्यायालयीन इतिहास लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई, हद्दपारीसारख्या कायदेशीर उपाययोजनांसाठी प्राथमिक माहिती मिळविण्यासही या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो.
पोलिसांचा वेळ आणि मनुष्यबळ वाचणार
वेगवेगळ्या न्यायालयीन नोंदी किंवा कार्यालयांकडून माहिती मिळविण्याऐवजी डिजिटल माध्यमातून आवश्यक माहिती उपलब्ध झाल्यास पोलिसांचा वेळ आणि मनुष्यबळ वाचण्यास मदत होणार आहे. गुन्हेगारी आढावा बैठकीदरम्यान एखाद्या आरोपी किंवा प्रकरणाची न्यायालयीन स्थिती तात्काळ तपासणेही शक्य होणार आहे.
जळगाव पोलिसांकडून या प्रणालीचा नियमित वापर केल्यास तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि गुन्हेगारी प्रतिबंध यामध्ये अधिक डेटा-आधारित आणि आधुनिक पोलीसिंगला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





