जळगाव शहर

जळगावत साजरी झाली राजकुमार यांची शंभरावी जयंती; फलक ठरले आकर्षण

जळगाव लाईव्ह न्यूज । हिंदी चित्रपट कित्येक नट प्रसिद्ध होतात आणि काही काळाने त्यांची प्रसिद्धी तितकीशी राहत नाही. मात्र दिग्गज अभिनेते राजकुमार त्यांच्या संवादामुळे आजही रसिकांच्या मनावर राज्य करतात.

आज प्रसिद्ध अभिनेते राजकुमार (मूळ नाव कुलभूषण पंडित) यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1926 रोजी झाला होता. ८ ऑक्टोबर 1926 रोजी त्यांची शंभरावी जयंती त्यांच्या चाहतांनी विविध ठिकाणी साजरी केली. जळगाव मध्ये ही राजकुमार यांचे चाहते दिनेश जगताप यांनी आपल्या दुकानाबाहेर “जानी हम तो राजकुमार है” असा फलक लावून राजकुमार यांची शंभरावी जयंती साजरी केली.

New Project 1

नूतन मराठा कॉलेज या जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या परिसरात हा फलक लागल्याने हा फलक उत्सुकतेचा विषय ठरला. राजकुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीला अनेक बाजीराव मर असे सिनेमे दिले आहेत. ज्यामध्ये मदर इंडिया पाकीजा वक्त सौदागर आणि तिरंगा असे सिनेमे आहेत. चहाता म्हणून दिनेश जगताप यांनी आज राजकुमार यांची १००रावी जयंती फलक लावून साजरी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button