
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२६ । सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. जळगाव जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सोन्यासह चांदी दरात घसरण झाली. जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर कालच्या तुलनेत प्रति तोळा १४०० रुपयांपेक्षा अधिक रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे चांदी देखील १ हजाराहून अधिकने घसरली.
जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारावरही होत आहे. अमेरिकन डॉलरची स्थिती, बॉण्ड यील्ड्समधील बदल, व्याजदरांबाबतच्या अपेक्षा तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. जळगावच्या बाजारपेठेतही त्याचे पडसाद उमटत असून, शनिवारी सोन्याच्या दरात घसरण झाली.
आज शनिवार सकाळी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोने दरात १४४२ रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह १,५२,५४३ रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत खाली आले. सोन्यासोबतच चांदी दरातही मोठी घसरण झाली आहे. आज शनिवारी सकाळी चांदीत १०३० रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३०,७२० रुपयांपर्यंत खाली आली.



