
जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची निवेदने स्वीकारणार असून, एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील.
असा असणार दौरा?
महसूलमंत्री बावनकुळे हे शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७वाजता जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात दाखल होऊन मक्काम करणार आहेत. त्यानंतर रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.५० वाजता ते शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाल्यानंतर नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता पातरखेडे येथे दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर ते धुळे जिल्ह्याकडे रवाना होणार आहेत.
दौऱ्याच्या महसूलमंत्र्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक राजशिष्टाचार, सुरक्षा व वाहन व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.





