नोकरी संधी

पदवीधरांसाठी खुशखबर ! कॅनरा बँकेत तब्बल 3500 जागांवर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी चालून आलीय. कॅनरा बँकेच्या अप्रेंटिसशिपसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल ३५०० जागा भरल्या जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील. अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करू शकतील. Canara Bank Apprentice Bharti 2026

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : अ‍ॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी भारत सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची असावी. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता १ सप्टेंबर २०२६ रोजीच्या तारखेनुसार मोजली जाईल.

वयाची अट काय?

कॅनरा बँकेच्या अ‍ॅप्रेंटिस पदासाठी, उमेदवाराचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असणे आवश्यक आहे. वयाच्या गणनेसाठी, उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९८ पूर्वी आणि १ सप्टेंबर २००६ नंतर झालेला नसावा. दोन्ही तारखा समाविष्ट आहेत.

किती विद्यावेतन मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना ₹१६,६५० चे मासिक विद्यावेतन मिळेल. ही रक्कम प्रशिक्षण कालावधीत दिली जाईल.

कॅनरा बँकेत प्रशिक्षार्थी म्हणून निवड झालेल्या उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी १२ महिन्यांचा असेल. या कालावधीत, उमेदवारांना निवडलेल्या बँक शाखांमध्ये अभ्यासक्रमानुसार प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळेल. याचा अर्थ असा की, त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान, त्यांना संबंधित बँक शाखेत निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार व्यावहारिक अनुभव देखील मिळेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button