खरेदीची संधी सोडू नका! जळगावात सोन्या-चांदी दरात मोठी घसरण; आजचे दर तपासून घ्या..

सप्टेंबर 24, 2026 2:53 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२६ । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असताना आज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील सुवर्णबाजारात सोन्याच्या दरात तब्बल १ हजार रुपये, तर चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घसरण झाली आहे. तुम्हीही आज खरेदीला जाणार असाल तर आजचे दर तपासून घ्या..

Gold silver

सोन्याच्या दरात १ हजारांची घसरण

जळगाव सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात १ हजार रुपयांची घट झाली. या घसरणीनंतर सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५५ हजार ५३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दरांनंतर झालेल्या या घसरणीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चांदीही ५ हजारांनी स्वस्त

दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. आज चांदीच्या दरात ५ हजार रुपयांची घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख ३९ हजार ९९० रुपये प्रति किलो झाला आहे.

खरेदीदारांना दिलासा

सोन्या-चांदीच्या दरात एकाच दिवसात झालेल्या घसरणीमुळे लग्नसराई, सणासुदी किंवा गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातू खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठ्यानुसार सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल होऊ शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now