गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिन साजरा

सप्टेंबर 16, 2026 5:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भारतरत्न सर विश्वेश्वरय्या मोक्षगुंडम यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्घाटन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल एच. पंडित, पवन शिंपी, अमोल पारेकर उपस्थित होते.

Engineers day godavari

यावेळी डॉ. पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत सर्जनशील विचार, आत्मविश्वास व समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याचे आवाहन केले. यशस्वी आयोजनासाठी प्रा. तुषार कोळी, डॉ. नितीन भोळे, डॉ. हेमंत इंगळे, प्रा. निलेश वाणी, प्रा. महेश एच. पाटील व डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभाग

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागात टीमच्यावतीने अभियांत्रिकी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. एच. टी. इंगळे, प्रा. डॉ. आय. एस. जाधव, प्रा. डॉ. व्ही. डी. चौधरी, प्रा. डॉ. देवेंद्र मराठे, प्रा. एम. एन. पाटील आणि प्रा. हेमराज धांडे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व रंजक क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now