iPhone प्रेमींना मोठा धक्का ! नवीन आयफोन लॉन्च होताच जुने मॉडेल्स झाले महाग

सप्टेंबर 10, 2026 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सामान्यतः जेव्हा एखादी कंपनी बाजारात नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च करते, तेव्हा जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असते. मात्र, अ‍ॅपल (Apple) कंपनीने या प्रथेला फाटा देत भारतीय ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. तो म्हणजे अ‍ॅपल कंपनीने आयफोन १८ सिरीज आणि आपला पहिला फोल्डेबल आयफोन लॉन्च केल्यानंतर, भारतात जुन्या आयफोनच्या किमतीत थेट २० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. यामध्ये आयफोन १७, आयफोन १७e, आयफोन एअर आणि आयफोन १६ सारख्या लोकप्रिय मॉडेलचा समावेश असून, ऍपलच्या अधिकृत भारतीय वेबसाइटवर या नवीन वाढीव किमती झळकू लागल्या आहेत.

iphone

मिळालेल्या माहितीनुसार, अॅपलने भारतात आयफोन 17 चा 256GB व्हेरिएंट ₹82,900 च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला होता. आता त्याची किंमत थेट ₹99,900 करण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना याच फोनसाठी तब्बल ₹17,000 अधिक मोजावे लागणार आहेत.

iPhone 17 तब्बल ₹२२ हजारांनी महाग

आयफोन 17 च्या 256GB मॉडेलची किंमत ₹82,900 वरून ₹99,900 झाली आहे. तर 512GB व्हेरिएंटची किंमत ₹1,02,900 वरून ₹1,24,900 करण्यात आली आहे. या मॉडेलच्या किमतीत तब्बल ₹22,000 ची वाढ झाली आहे.

iPhone 17e च्या किमतीतही मोठी वाढ

अॅपलने आयफोन 17e च्या किमतीतही मोठी वाढ केली आहे. 256GB मॉडेलची किंमत ₹64,900 वरून ₹79,900 झाली आहे. म्हणजेच हा फोन ₹15,000 ने महाग झाला आहे. त्याचप्रमाणे 512GB व्हेरिएंटची किंमत ₹84,900 वरून ₹1,04,900 करण्यात आली आहे. या मॉडेलसाठी ग्राहकांना आता ₹20,000 अधिक खर्च करावा लागणार आहे.

iPhone Air वर सर्वाधिक फटका

आयफोन एअरच्या काही मॉडेल्सच्या किमतीत तर तब्बल हजारो रुपयांची वाढ झाली आहे. 256GB मॉडेलची किंमत ₹1,19,900 वरून ₹1,49,900 झाली असून, त्याची किंमत ₹30,000 ने वाढली आहे.

512GB व्हेरिएंटची किंमत वाढून ₹1,74,900 झाली आहे. तर 1TB मॉडेलची किंमत ₹1,59,900 वरून थेट ₹2,24,900 करण्यात आली आहे. म्हणजेच या मॉडेलच्या किमतीत तब्बल ₹65,000 ची वाढ झाली आहे.

iPhone 16 देखील महागला

अॅपलने आयफोन 16 च्या 128GB व्हेरिएंटची किंमतही वाढवली आहे. या मॉडेलसाठी आता ग्राहकांना ₹89,900 मोजावे लागणार आहेत. पूर्वीच्या किमतीच्या तुलनेत ही तब्बल ₹20,000 ची वाढ आहे.

जुन्या आयफोनच्या किमती का वाढल्या?

नवीन आयफोन लॉन्च झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमती कमी करण्याऐवजी अॅपलने वाढ का केली, याबाबत स्मार्टफोनमधील आवश्यक घटकांच्या वाढत्या किमतीकडे प्रमुख कारण म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः मेमरी चिप्सच्या किमतीत झालेली वाढ हे सर्वात मोठे कारण आहे. सध्या एआय (AI) आणि डेटा सेंटर उद्योगांमध्ये मेमरी घटकांची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर (Supply Chain) मोठा दबाव आला असून, त्याचा थेट परिणाम उत्पादनांच्या किमतींवर झाला आहे.

नवीन आयफोन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सामान्य ग्राहकांच्या खिशावर या दरवाढीमुळे मोठा ताण पडणार असल्याचे दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now