पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी ! IBPS मार्फत तब्बल 13,706 पदांसाठी मेगाभरती

सप्टेंबर 1, 2026 1:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवीधर असाल आणि बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) मार्फत तब्बल 13 हजार 706 पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट, असिस्टंट मॅनेजरसह विविध अधिकारी पदांचा समावेश असून, पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. IBPS RRB Bharti 2026

IBPS RRB 1

कोणत्या पदांसाठी किती जागा?

या भरतीमध्ये ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पदाच्या 8,183 जागा आहेत. तसेच ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4,256, ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर (मॅनेजर) 666, ऑफिसर स्केल-II IT 182, ऑफिसर स्केल-II CA 81, ऑफिसर स्केल-II लॉ 46, ऑफिसर स्केल-II ट्रेझरी मॅनेजर 18, ऑफिसर स्केल-II मार्केटिंग ऑफिसर 16, ऑफिसर स्केल-II अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर 38 आणि ऑफिसर स्केल-IIIच्या 220 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल-I पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसरसाठी कोणत्याही शाखेतील पदवीसह किमान 50 टक्के गुण आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

IT पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. CA पदासाठी CA तसेच एक वर्षाचा अनुभव, तर लॉ पदासाठी 50 टक्के गुणांसह LLB आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

ट्रेझरी मॅनेजर पदासाठी CA किंवा MBA (Finance), मार्केटिंग ऑफिसरसाठी MBA (Marketing), तर अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर पदासाठी कृषी व संबंधित विषयातील पदवी आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-III पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण आणि पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती?

1 सप्टेंबर 2026 रोजी वयाची गणना करण्यात येणार आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी 18 ते 28 वर्षे, ऑफिसर स्केल-I साठी 18 ते 30 वर्षे, ऑफिसर स्केल-IIच्या विविध पदांसाठी 21 ते 32 वर्षे, तर ऑफिसर स्केल-IIIसाठी 21 ते 40 वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST उमेदवारांना पाच वर्षे, तर OBC उमेदवारांना तीन वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

ऑफिस असिस्टंट पदासाठी GEN/OBC उमेदवारांना 850 रुपये, तर SC/ST/PWD/Ex-Servicemen उमेदवारांना 175 रुपये शुल्क आहे. ऑफिसर स्केल-I ते III पदांसाठी GEN/OBC उमेदवारांना 850 रुपये, तर SC/ST/PWD उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.

परीक्षा कधी होणार?

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2026 आहे. पूर्व परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबर 2026 मध्ये होण्याची शक्यता असून, एकल/मुख्य परीक्षा डिसेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे.

पदवीधरांनी संधीचा लाभ घ्यावा

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधरांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जपद क्र.1: Apply Online
पद क्र.2 ते 10: Apply Online

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now