जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । जळगाव शहरातील समता नगरामधील एक ३० वर्षीय तरुणाने वाळू व्यवसायात कर्जबाजारी झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीला आली. राजु पन्नालाल यादव (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत थोडक्यात असे की, समतानगर परिसरातील राजू यादव याचे शहरातील आटोनगर मध्ये डंपर बॉडी चेसेस रिपेरिंगचे गॅरेज आहे. याने एका व्यक्ती जवळून एक ते दीड वर्षापूर्वी रेतीचे डंपर विकत घेतले होते. सदर या डंपरला दुरुस्तीसाठी राजु यादवने जवळपास ३ लाख रूपये खर्च केला होता. ज्या व्यक्तीकडून डंपर विकत घेतले होते. त्याला ५० हजार रूपये देण्याचे बाकी होते.
या कारणामुळे राजू गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. गुरुवारी रात्री राजूने आपल्या परिवारासह जेवण केले. घरात मागच्या खोलीत जावून रात्री 11 वाजता राहात्या घरात कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात दोन मुली, पत्नी, आई , तीन बहिणी, मोठा भाऊ असा परिवार आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.