जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. २३ रोजी शहिद दिनाचे आयोजन करण्यात आले. ज्यात भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

तसेच महाविद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र यांचे मदतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.केतन चौधरी, रासेयो प्रमुख डॉ. वंदना चौधरी, प्रा.प्रवीण कोल्हे, केसीईचे जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, डॉ. शैलजा भंगाळे, डॉ. रंजना सोनवणे, डॉ. गणेश पाटील, केतन पाटील, विजय चव्हाण, शरद सोनार तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







