डॉ. उल्हास पाटील मेडीसीन विभागातर्फे वृध्द वैद्यकशास्त्र विषयावर परिषद
जळगाव लाईव्ह न्यूज । वृध्द वैद्यकशास्त्र अभ्यासतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. परिषदेसाठी आलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वक्त्यांकडून मिळणारे ज्ञान हे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संपत्ती असल्याचे मत गोदावरी हेल्थ सिटीचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनरल मेडीसीन विभागातर्फे वृध्द वैद्यकशास्त्र : प्रतिबंधापासून उपशामक उपचारापर्यंत या विषयावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. परिषदेच्या सुरूवातीला चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. अनिता बसवराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच स्व. गोदावरी पाटील व धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. सी.डी. सारंग, सचिव डॉ. युवराज बढे, डॉ. प्रमोद उमर्जी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ५०० प्रतिनीधींची झालेली नोंदणी हे या परिषदेचे यश आहे.

परिषदेला वक्ते म्हणून आलेल्या तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांनी प्रात्याक्षिक स्वरूपात ज्ञान प्राप्त करून घ्यावे. तसेच वृध्द वैद्यकशास्त्र या विषयाची सखोल माहिती घ्या. मी बी.जे. मेडीकल कॉलेजला शिकतांना प्रा. डॉ. डि.के. मित्रा यांची आठवण त्यांनी सांगितली. परिषदेत विविध विषयावर तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या लेखी नोंदी घेण्याचे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक सेकंदाला बदल होत आहे. या बदलांबाबत विद्यार्थ्यांना अपडेट ठेवण्यसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे परिषद, कार्यशाळा, प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच राज्यस्तरीय स्पर्धा देखील महाविद्यालयामार्फत घेतल्या जातात. जनरल मेडीसीन विभागाने आयोजित केलेल्या या परिषदेचे त्यांनी कौतुक केले. परिषदेचे प्रास्ताविक आयोजन समितीचे चेअरमन डॉ. सी.डी. सारंग यांनी केले. परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. स्वानंद झंवर, डॉ. सृष्टी सोनपसारे, डॉ. खुशी सुराणा यांनी केले. यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे डॉ. तन्मय मेहता यांनी परिश्रम घेतले.
यांनी केले मार्गदर्शन
या परिषदेत डॉ. सी.ए. कांते, डॉ. पल्लवी बढे, डॉ. अभय जोशी, डॉ. विजया दाते, डॉ. अनिता बसवराज, डॉ. अपर्णा साधळे, डॉ. अंजली शेटे, डॉ. प्रमोद उमर्जी, डॉ. भूषण चोपडे, डॉ. चिमू चिंते, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. सी.डी. सारंग, डॉ. युवराज बढे, डॉ. रोशन राजपूत या तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.







