जळगाव डाक विभागातर्फे १८ ऑगस्ट रोजी विभागीय पेन्शन अदालत

ऑगस्ट 14, 2026 4:18 PM

जळगाव । जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक तक्रारी समजून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता डाक अधीक्षक, जळगाव विभाग, जळगाव यांच्या कार्यालयात ‘विभागीय पेन्शन अदालत’ आयोजित करण्यात येणार आहे.

court

जळगाव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनविषयक ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नाही किंवा ज्याबाबत समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या पेन्शन अदालतमध्ये दाखल घेण्यात येणार आहे. यामध्ये टपाल विभागातून निवृत्त झालेल्या अथवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा विचार करण्यात येईल.

पेन्शन अदालतमध्ये वैयक्तिक कायदेशीर प्रकरणे, जसे की वारस प्रकरणे तसेच नीती आधारित सूचना अथवा तक्रारींचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

पेन्शनधारकांनी आपली तक्रार अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव – ४२५००१ या पत्त्यावर दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावी. दि. १७ ऑगस्ट २०२६ नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही अशी माहिती डाकघर अधिक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now