जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोल येथून एक खलाबकजनक घटना समोर आलीय. येथे गहाण ठेवलेली मोटरसायकल सोडवण्यासाठी पैसे मागण्याच्या वादातून पत्नी आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने मिळून बापाची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. करणसिंग रामसिंग पवार (वय ४५) असं या खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी अरुणाबाई पवार आणि तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेने आंबेहोल परिसरात आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास करणसिंग पवार यांनी पत्नी अरुणाबाई यांच्याकडे गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पैशांची मागणी केली. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या अरुणाबाई आणि त्यांच्या १७ वर्षीय मुलाने करणसिंग यांच्यावर हल्ला केला.

यावेळी अल्पवयीन मुलाने सायकलमध्ये हवा भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंपाने करणसिंग यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर अरुणाबाई यांनी दोरीच्या सहाय्याने त्यांचा गळा आवळला. या घटनेत करणसिंग यांचा मृत्यू झाला.
करणसिंग हे दारूचे व्यसन करत असून पत्नी व कुटुंबीयांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी कुटुंबाच्या संमतीशिवाय जमीन विकल्याच्या कारणावरूनही घरात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व त्रासाला कंटाळून आई आणि मुलाने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू करून अरुणाबाई पवार आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दोन्ही










