प्रवाशांनो लक्ष द्या! भुसावळ–दादर खान्देश एक्सप्रेस ‘या’ स्थानकावरून सुटणार?

ऑगस्ट 8, 2026 1:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळहुन सुटणाऱ्या खान्देश एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातील भादली स्थानकावर सुरू असलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या महत्त्वपूर्ण कामामुळे भुसावळ-दादर खान्देश एक्सप्रेसच्या संचालनात बदल करण्यात आला आहे.

khandesh

इगतपुरी-भुसावळ दरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत भादली स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी आवश्यक जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे रेल्वे बाहतुकीवर तात्पुरता परिणाम होत असून, काही गाड्यांच्या संचालनात बदल करण्यात येत आहेत.

यापूर्वी १२ ऑगस्ट २०२६ रोजी १९००४ भुसावळ दादर खान्देश एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णयात बदल करून ही गाडी अमळनेर स्थानकापासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भुसावळ ते अमळनेर या दरम्यान ही गाडी रद्द राहणार आहे.

तसेच गाडी क्रमांक १९००३ दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेस १२ ऑगस्ट रोजी दादरहून आपल्या नियोजित वेळेनुसार रवाना होईल. मात्र, ही गाडी भुसावळपर्यंत न जाता अमळनेर स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे अमळनेरनंतर भुसावळपर्यंतचा प्रवास या दिवशी रद्द राहणार आहे.

दरम्यान, इगतपुरी-भुसावळ दरम्यान भादली ते जळगाव पाचव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाअंतर्गत भादली स्थानकाच्या यार्डची पुनर्रचना तसेच पाचव्या मार्गासाठी आवश्यक जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे रेल्वे बाहतुकीवर तात्पुरता परिणाम होत असून, काही गाड्यांच्या संचालनात बदल करण्यात येत आहेत. त्यात खान्देश एक्स्प्रेसमध्ये झालेल्या या बदलामुळे दादरहून खान्देशकडे येणाऱ्या प्रवाशांनी अमळनेरनंतरच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now