जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार? वाचा हवामान अंदाज

ऑगस्ट 8, 2026 9:26 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाने काहीशी उसंत घेतली होती. मात्र, आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी ८ आणि ९ ऑगस्ट रोजी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

mansoon rain jpg webp

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी काल हवामान खात्यानं जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिली. सध्या जिल्ह्यात ऊन-सावलीचा खेळ सुरु आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती कशी राहणार?

८ आणि ९ ऑगस्ट : जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
१० ते १५ ऑगस्ट : जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
१६ ते २० ऑगस्ट : या कालावधीत काही ठिकाणी पाऊस तर काही काळ पावसाचा खंड, अशी मिश्र स्थिती राहण्याची शक्यता आहे.
ऑगस्टचा शेवटचा आठवडा : महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now