अंमली पदार्थांविरोधात जळगाव पोलिसांचे ‘मिशन RISE’; महाविद्यालयीन युवक करणार जनजागृती

ऑगस्ट 6, 2026 1:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाच्या अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन RISE (Youth Leadership for a Drug-Free Jalgaon)’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांना अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचे नेतृत्व करण्यासाठी तयार करण्यात येणार असून, व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

SD

पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे ५ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, संजय येनपुरे यांच्या हस्ते ‘मिशन RISE’ अभियानाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून ‘युवा ड्रग्स प्रतिबंधक नेते (Student Leaders)’ निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ प्रतिबंध, व्यसनमुक्ती जनजागृती, सामाजिक नेतृत्व, प्रभावी संवादकौशल्य आणि सकारात्मक युवक सहभाग याबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात तसेच परिसरात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवून जनजागृतीचे कार्य करतील.

‘RISE’ म्हणजे काय?
R – Resist Drugs : अंमली पदार्थांना ठाम नकार
I – Inspire Others : इतरांना प्रेरणा द्या
S – Support Friends : मित्रांना योग्य वेळी मदत करा
E – Empower Drug-Free Communities : अंमली पदार्थमुक्त समाज घडवा

या अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ ७ ऑगस्ट २०२६ रोजी एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथे होणार आहे. यावेळी निवड झालेल्या सर्व युवा नेत्यांना सन्मानपूर्वक ओळखपत्र (बॅज) प्रदान करण्यात येणार असून, त्यांना व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि जबाबदाऱ्यांची माहिती दिली जाणार आहे.

यावेळी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ पोलीस दलाचा नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शिक्षक, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि सर्व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सशक्त जळगाव घडविण्यासाठी सहकार्य करावे.”

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now